Search This Blog

Saturday, May 26, 2012

काजवा महोत्सव

घाटघर आणि रतनवाडी परिसरात १५ मे ते १५ जून या काळात रात्रीच्या वेळी काजव्यांची झाडे फुलतात. असंख्य काजव्यांचे पुंजके झाडांवर चमकतात, तेव्हा आकाशातील चांदण्या जणू जमिनीवर येऊन लुकलुकतात असे दृश्‍य दिसते. त्याला परिसरात काजवा महोत्सव म्हणतात. मात्र कितीतरी पर्यटकांना याबाबत माहिती नाही. मे-जून हा काजव्यांचा प्रजननकाळ असल्याने आणि परिसरात सर्वाधिक असलेल्या सादड या झाडांची फुले त्यांचे आवडते अन्न असल्याने या काळात तिथे काजवे सर्वाधिक आढळतात.