Search This Blog

Friday, May 10, 2013

पुन्हा एकदा काजवे.....

मे महिन्याचा शेवट होत आला की वेध लागतात ते काजव्यांचे,  घाटघर-शेंडी रस्त्यावर भंडारदर्यावरुन रतनवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर, बारी घाटापासून भंडारदरा पर्यंतच्या रस्त्याने काजव्यांनी लगडलेली अशी झाडे दिसतात. दिवसागणिक त्यांची संख्या वाढत जाते. हवेतील दमटपणा वाढला, मृगाची हलकी सर येऊन गेली की त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ आढळते. या परिसरात दरवर्षी होणाऱ्या काजवे महोत्सवाचा हा परमोच्च क्षण असतो. खरंतर काजवा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कीडनाशक (pest control) म्हणून तो उपयुक्त आहे आणि दूरदूरच्या खेडय़ांत, गावांत जिथं वीज पोहोचलेली नाही, तिथल्या काही रात्री तर काजव्यांच्या जादुई दिव्यांनी प्रकाशमान होतात! याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ..... किरण डोंगरे यांनी शुट केलेला.
 अधिक माहिती करिता... http://sahyagiri.com/kajva-mahotsav.php#.UY0WGEpdxro


No comments: